म्या कुणबी,
सिलिंगमध्ये जमीन मिळाली,
कूळकायद्याने मालक झालो,
जमीनदार देशोधडीला लावला,
आता मला आरक्षण फायजे.
देत कस नाय, राडाच करतो.
म्या कुणबी,
सिलिंगमध्ये जमीन मिळाली,
कूळकायद्याने मालक झालो,
जमीनदार देशोधडीला लावला,
आता मला आरक्षण फायजे.
अमुक पाटील, तमुक पाटील.
मित्रांनो, पाटील गावचा मुखिया असायचा.
ओढून ताणून पाटील लावाल तर वांदा व्हायचा,
कुणबी प्रमाणपत्र मिळायचा चान्स जायचा.
सावधान,
आता तरी पाटील व्हायचा नाद सोडा.