म्हातारी मेल्याचे
दुःख नाही, पण काळ सोकावतो त्याचे काय?
नवाब मलिक यांनी
बाजारभावापेक्षा कमी किमतीत विकत घेतलेल्या मालमत्तेचा पैसा विक्रेत्याने अतिरेकी
कार्यवाहीसाठी वापरला आहे म्हणून नवाब मलिक गुन्हेगार आहेत या तब्बल वीस वर्षानंतर केलेल्या आरोपाचे विश्लेषण करता यापुढे प्रत्येक खरेदीदाराने ज्या विक्रेत्याकडून
मालमत्ता विकत घेतली आहे तो विक्रेता सदर विक्रीतून मिळालेल्या पैशाचा विनियोग तो
कसा करतो आहे याचा पाठपुरावा केला पाहिजे की काय किंवा सदर विक्रेता त्याला
मिळालेल्या रकमेतून कुठलेही बेकायदेशीर कृत्य करणार नाही असा मजकूर खरेदीखतात टाकावयाचा की काय असे प्रश्न निर्माण झाले आहेत.
आश्चर्य म्हणजे बाजारभावापेक्षा कमी किमतीत मालमत्ता विकत घेतली आहे असा आरोप करताना गुन्हा मात्र भ्रष्ट मार्गाने
पैसे गोळा केल्याचा दाखल
केला आहे.
अत्यंत अतार्किक आणि हास्यास्पद आरोपांचे आधारावर जर एखाद्या राज्याच्या
मंत्रीमहोदयांना पोलिस कस्टडी ची हवा खावी लागत असेल तर सामान्य लोकांचे जगणे या
गुन्हा अन्वेषण संस्था किती कठीण करून ठेवतील याचा विचारच न केलेला बरा.
अंदाधुंद व्यवस्था
समाजाला फक्त अराजकाकडेच नेते.
असो, यथा प्रजा तथा
राजा. आम्हाला फक्त राखीव
जागा देण्याचे गाजर दाखवणारे आणि
भगवा झेंडा पुढे करून झुलवनारे पक्ष हवे असतील तर
जनतेने परिणामास तोंड देण्यास सिद्ध असावे.
या देशाला आणि राज्याला सत्तापिपासू लोकांपासून देव तरी वाचवू शकेल काय? अवघड आहे.
No comments:
Post a Comment