19 May 2026

लातूर / अहमदपूर शैक्षणिक संस्कृती/पॅटर्न Latur / Ahmedpur Education Pattern.

लातूर पॅटर्न हा त्या महत्वाकांक्षी विद्यार्थ्यांनी यशस्वी केला ज्यांना शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नव्हता. हा पॅटर्न फक्त लातूर शहरापुरता मर्यादित नव्हता तर अहमद्पुर आणि उदगीर येथील महाविद्यालयेदेखील हा पॅटर्न यशस्वीरीत्या राबवत होते. शिक्षक आणि विद्यार्थी यांचे अतूट नातं हा त्याचा पाय होता. मी स्वतः हरफनमौला असल्यामुळे मला तो झेपला नाही, परंतु सोबतच्या यशस्वी विद्यार्थ्यांची अपार मेहनत अतुल्य होती. मोटेगावकरसारख्या विषाणूमुळे लातूर / अहमदपूर येथील सशक्त शैक्षणिक संस्कृतीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे चुकीचे आहे. लातूर / अहमदपूर येथील पालक आणि विद्यार्थी कुठल्या पराकाष्ठेची मेहनत करायचे याची मांडणी श्यामची मम्मी या नाटकात खूप सुंदर केली आहे. 
VAKILSAHEB


No comments: