अहमदपूर येथील मराठा कुणबी स्मशानभूमी प्रकरणात माननीय उच्च न्यायालयाचा समाजाचे बाजूने न्यायनिर्णय.
अहमदपूर येथील मराठा कुणबी स्मशान भूमीबाबत सन २००३ पासून जमिनीच्या मूळ मालकाच्या सुनेने वाद निर्माण केला होता. माननीय उच्च न्यायालयाने (माननीय न्यायमूर्ती किशोर संत) सदरचा न्यायनिर्णय देताना सदर वादीने तिच्या सासऱ्याकडून करून घेतलेले खरेदीखतच बेकायदेशीर असल्याचा निष्कर्ष नोंदवत सदर जमिनीचा वापर स्मशानभूमी म्हणून सन १९६० पूर्वीपासूनच निरंतर वापर होता व आहे असा निष्कर्ष नोंदवत मराठा कुणबी समाजाचा स्मशानभूमीवरील अधिकार अधोरेखित व कायम केला आहे. सदरची स्मशानभूमी अहमदपूर येथील सर्वे क्रमांक १९८ पोट हिस्सा क्रमांक २ मध्ये १ हेक्टर २० आर क्षेत्रावर स्थित आहे. सदर प्रकरण प्रलंबित असताना वादीने अंतिम संस्कारासाठी गेलेल्या अनेक लोकांवर फौजदारी केसेस दाखल करून दहशतीचे वातावरण निर्माण केले होते. आज तब्बल वीस वर्षानंतर अहमदपूर येथील मराठा कुणबी समाज सदर कुचंबणेतून मुक्त झाला आहे.
No comments:
Post a Comment